यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । राज्यातील एसटीच्या विविध तालुक्यातील एकुण २५० आगारातील काम करणाऱ्या शेकडो वाहक आणी चालकांची आता नियमित मद्यपान चाचणीच्या मोहिमेस सुरूवात झाली असुन , यावल जिल्हा जळगाव या आगारात आतापर्यंत सुमारे १०५ चालक आणी वाहकांच्या मद्यपान चाचणीची यंत्रणेव्दारे तपासणी करण्यात आली आहे, माहिती आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी पत्रकारांना दिली.
यावलच्या एसटी आगारात सेवा देणारे सुमारे चालक १२६आणी १३१वाहक एकुण २५७ कर्मचाऱ्यांची यावल आगारात मंडळाच्या आदेशा अनुसार मद्यपान चाचणीच्या अमलबजावणी सुरूवात करण्यात आली असुन ,यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आगारातील वाहतुक निरिक्षक,वाहतुक नियंत्रक,आगार लेखाकार आणी वरिष्ठ लिपिक यांच्या संयुक्त पथकाच्या वतीने नियमित मद्यपान चाचणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
एसटीतील वाढत्या मद्यपानाच्या त्यातुन होणाऱ्या अपघात व अप्रीय घटना आणी प्रकरणांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळातील वाहतुक खातं,सुरक्षा आणी दक्षता खातं यांच्या संयुक्तपणे ही मद्यपान चाचणी मोहीम राबवण्यास सुरूवात झाली असुन , महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणारी ही मद्यपान चाचणी मोहीम पारदर्शकपणे राबविण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक महाजन यांनी पत्रकारांना सांगीतले.