रिपाइंची फैजपूर शहर कार्यकारिणी जाहीर

8142a542 a581 4b04 8f7d 3ac3e7d6d5fd

फैजपूर, प्रतिनिधी | रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेशजी मकासरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख आनंद बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज (दि.२२) फैजपूर/सावदा शहर कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. कार्यकारीणीत निर्मला लोहार, विधानसभा क्षेत्र उपाध्यक राजू लोहार, तालुका उपाध्यक्ष लखन लोहार, कलीम शेख मसीर, विलास शंकर, यशवंत अनंत राव, शिंदे, संदीप तायडे यांची निवड करण्यात आली.

 

यावेळी विधानसभा क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी रिपाइंत प्रवेश केला. यावेळी महिला जिल्हाप्रमुख नंदाताई बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष युवराज सोनवणे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक तायडे, महिला विधानसभा अध्यक्षा लक्ष्मीताई मेढ़े, युवा तालुकाध्यक्ष संजय तायडे यांच्यासह अनेक पदाअधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content