परसाडे येथे विहिरीत उडी घेवून तरुणाची आत्महत्त्या

010f4a3f fdd5 440b 8158 396dd2c408d8

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील परसाडे शिवारात एका तरुणाने कोरडया विहीहिरीत उडी घेवुन आत्महत्त्या केल्याची घटना आज (दि.२२) घडली.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास परसाडे शिवारातील तुषार प्रभाकर चौधरी यांच्या १५० फुट खोल असलेल्या कोरडया विहिरीत येथील रहिवासी समाधान बाबुराव सावळे (वय ३५)  यांनी उडी घेवून आत्महत्त्या केली. या तरुणाने आत्महत्त्या का केली ? याचे कारण मात्र समजु शकलेले नाही. आत्महत्त्येचे वृत कळताच गावकऱ्यांनी त्या विहिरीकडे धाव घेतली व तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. समाधान सावळे याच्या मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश मेढे यांनी शवविच्छेदन केले,. या घटनेची खबर मयताचे काका रमेश सोना सावळे यांनी दिल्यानंतर येथील तालुका पो.स्टे.ला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content