जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयामार्फत दरवर्षी १२ ते १८ डिसेंबर दरम्यान क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार याही वर्षी क्रीडा कार्यालय व जिल्ह्यातील विविध शाळांच्या सयुंक्त विध्यमाने क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र शासनामार्फत फीट इंडिया मुमेंन्ट कार्यक्रमांची अमंलबजावनी करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले असून त्यानुसार १२ ते १८ डिसेंबर या दरम्यान शहरात विविध उपक्रमाचे आयोजन करून क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. या अनुषंगाने ता. १८ रोजी शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे आंतरशालेय जलतरण स्पर्धा घेऊन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या जलतरण स्पर्धेत ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी स्पर्धेत विजयी ठरलेल्या जलतरणपटूना जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा व स्कूलचे व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे यांच्या हस्ते आकर्षक पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या समारोप कार्यक्रमासाठी क्रीडाशिक्षक संजय चव्हाण, जलतरण प्रशिक्षक कमलेश नगरकर, ज्योत्स्ना पोद्दार, तसलीम रंगरेज, विजया अडकमोल, अमोल जोशी, काशिनाथ सोनार, मिरसिंग बारेला, शिवाजी भालेराव सुरज दायमा, हर्षवर्धन महाजन यांनी सहकार्य केले. सदर समारोप कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व कार्यकारी संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेचा निकाल
इयत्ता पहिली व दुसरी (मुले) – गुरुदीप जंगले, हृदय सोनवणे, आरव कुकरेजा, द्रोण बिराडे, युजुर्व साठे, क्षितिज मोरे, वर्णित लुनावत
(मुली) – गौरी बाविस्कर, नंदिनी सूर्यवंशी, सिया दहाड, शिप्रा महाशब्दे, स्वरा कासट, स्वरा वाघ
इयत्ता तिसरी व चौथी (मुले) – ईवान जैन, समर्थ काळे, विराष सुराणा, मानस वंजारी, जयदीप भोसले, जयवर्धन पाटील, जकरीया खाटीक.
(मुली) – ईरा झंवर, विधी सावना, निधी पंडित, कौशिकी चौबे, आलिया तडवी, आर्या नहाटा, शर्वरी खैरनार, गारगी ठाकरे