डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत क्रीडा महोत्सवाला रंगतदार बनवले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मिश्रा, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील, स्कुल ऑफ नर्सिंगचे संचालक शिवानंद बिरादर, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडेमुळे शारीरिक आणि मानसिक विकास घडतो यावर मार्गदर्शन केले. तसेच, नियमित खेळाच्या सवयीमुळे शरीर तंदुरुस्त राहते व जीवनशैली सुधारते, याकडे लक्ष वेधले.कार्यक्रमात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे आणि पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय अधिकारी चेतन चौधरी, मोहित येवले, महाविद्यालयातील क्रीडा समिती यांनी अथक मेहनत घेतली.

Protected Content