Home Cities मुक्ताईनगर ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे...

‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची उपस्थिती


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत मुक्ताईनगर येथे आयोजित कार्यक्रमाला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षण उपक्रमात कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक मजबुती आणि समाजाभिमुख कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण महाअभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला. तसेच जनतेशी संवाद अधिक प्रभावीपणे कसा साधावा, पक्षाच्या धोरणांचा प्रसार कसा करावा आणि शासनाच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचवाव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यात आले.

मुक्ताईनगर येथे पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, डॉ. राजेंद्रजी फडके, अशोकभाऊ कांडेलकर, मंडळ अध्यक्ष (मुक्ताईनगर उत्तर) मोहन महाजन, मंडळ अध्यक्ष जयपाल बोदडे यांच्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound