पहूर येथे बालकवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिवंगत बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे हिच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त काल रविवारी ज्ञानवेद प्रबोधिनी तर्फे महात्मा फुले शिक्षण संस्थेत खुल्या बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले . ६७ बालकवी – कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून उत्स्फुर्त सहभाग घेतला . बाल साहित्यिक पी . टी . पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले . बालकवयित्री रूपाली माळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .

प्रारंभी संताजी जगनाडे महाराज , संत रोहीदास महाराज व बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. बालवयात शालेय विद्यार्थ्यांमध्ये साहित्य अभिरुची निर्माण व्हावी , या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात ‘आई ‘, ‘बाबा ‘ , ‘शाळा’ , ‘निसर्ग ‘, ‘शेतकरी ‘, ‘ शिवाजी महाराज ‘, ‘भिडेवाडा ‘ , ‘सावित्रीमाई ‘ , ‘भाऊ ‘ अशा विविध विषयांवर बालकवींनी आपल्या कविता सादर केल्या.

सर्व सहभागी बालकवींना संमेलनाचे अध्यक्ष पी .टी . पाटील यांच्यातर्फे ‘किलबिल ‘ बालकाव्यसंग्रह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , अजय देशमुख , भगवान जाधव , अमोल क्षीरसागर , किरण पाटील , विद्या पवार , तुकाराम जाधव , तुषार बनकर , ईश्वर हिवाळे , निळकंठ महाराज आदींची उपस्थिती होती . सुत्रसंचालन गायत्री पवार व प्रणिता क्षीरसागर यांनी केले . ज्ञानवेद प्रबोधिनीच्या उपाध्यक्षा कल्पना बनकर , सचिव हरिभाऊ राऊत यांचे सहकार्य लाभले. शंकर भामेरे यांनी आभार मानले .

छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे आयोजित ७व्या कुमार साहित्य संमेलनाच्या निवड फेरीसाठी जळगावला जात असतानाच पहूर येथील वाघूर पूलाजवळ आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत बालकवयित्री ज्ञानेश्वरी गतप्राण झाली होती . या दुर्दैवी घटनेला ८ डिसेंबर रोजी १ वर्ष पूर्ण झाले.

मंथन चौधरी, गुंजन कासुंदे, जागृती क्षीरसागर, श्रावणी लोहार, विशाखा गायकवाड, गायत्री उबाळे, अविका पनस्कर, गितेश्वरी चौधरी, रिया सटाले, त्रिशा जाधव, मुनिरा शेख, सानिया तडवी, सुजाता देशमुख, भाविका पाटील, वेदिका भामेरे, मोहिनी निकम, प्रणव पाटील, चैतन्या घोंगडे यांच्यासह आर . टी . लेले हायस्कूल, आर . बी . आर . विद्यालय, डॉ . हेडगेवार विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालयांतील तसेच परिसरातीलील ६७ बालकवी – कवयित्री सहभागी झाल्या होत्या .

Protected Content