जळगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व कामगारांनी आज दुपारी प्रवेशद्वाराजवळ उत्स्फूर्तपणे काळे झेंडे घेवून निषेध आंदोलन केले. यावेळी भिंत व मुताऱ्या पाडल्याबद्दल तसेच बाजार समिती परिसरातील सुमारे सव्वाशे झाडे तोडल्याबद्दल संबंधितांचा निषेध करण्यात आला.
यावेळी व्यापारी व कामगारांच्या प्रतिनिधींनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले की, सुमारे १५ दिवसांपूर्वी विकासकाने येथील संरक्षक भिंत आणि मुताऱ्या पाडल्या होत्या. त्यावेळी आम्ही आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी १५ दिवसात दोघांचे पुन्हा बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. जर आताही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले तर यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.