
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कानळदा रोडवरील अंबिका मार्बल दुकानासमोर भरधाव गॅसने भरलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी झाल्याची घटना शनिवारी २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात गुरुवार २५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता ट्रकवरील चालकावर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये चैतन्य गोविंदा ताम्हणकर हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चैतन्य हा त्याची दुचाकी क्रमांक (एमएच ३१ इडब्ल्यू १९०९) ने कानळदा रोडवरील अंबिका मार्बल दुकानासमोरून जात होता. त्यावेळी समोरून येणारी गॅसने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ५४९६) धडक दिली. या अपघातात चैतन्याच्या डोक्याला उजव्या हाताला तसेच हाताची करंगळी तुटून पडली. यासंदर्भात सीमा ताम्हणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील अज्ञात चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तावडे हे करीत आहे.



