जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रांची निर्मिती होऊन जळगाव जिल्ह्यासह इतर राज्यांमध्ये तस्करी केली जाते. अनेकदा मोठ्या प्रमाणावर पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येऊन शस्त्रसाठा ही जप्त केला जातो. गुन्हे ही दाखल होतात, मात्र त्यानंतरही या परिस्थितीवर आळा बसत नसल्याचे चित्र आहे.
मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या या शास्त्र तस्करीवर आळा बसावा तसेच उमर्टी येथे येथे पोलिसांची दहशत निर्माण होऊन वचक बसावा, जळगाव जिल्हा पोलीस दल व मध्य प्रदेश पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
या कोंबींग ऑपरेशन मध्ये पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. या ऑपरेशन दरम्यान उमर्टी येथे प्रत्येक घरात झाडावरती करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी कुठलाही शस्त्रसाठा जप्त केलेला नाही किंवा कुणालाही ताब्यात घेतलेला नाही. फक्त या ठिकाणच्या शस्त्र विक्रीवर कायमस्वरूपी आळा बसावा, या ठिकाणाहून होणारी तस्करी थांबावी, या ठिकाणच्या नागरिकांमध्ये पोलिसांची कायमची दहशत निर्माण व्हावी. त्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश पोलीस आणि जळगाव पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हे कोंबिग ऑपरेशन राबविण्यात आले. पूर्वी ज्या पद्धतीने पोलीस थेट कारवाई करू शकत नव्हते, आता मात्र पोलीस केंव्हाही या ठिकाणी कारवाई करू शकतात. असा संदेश ही या कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून देण्यात आला.