दुचाकी चोरीतील आरोपीस अटक; एलसीबीची कारवाई

LCB karwai news

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बी.जे.मार्केटमधून दुचाकी चोरी प्रकरणातील चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा पेठ हद्दीतील बी.जे.मार्केट मधून दुचाकी चोरीस गेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भाग ५ गुरनं. १६८/२०१९ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हयात मोटार सायकल चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना दिलेल्या सुचनेनुसार पोनि बापु रोहोम गुन्ह्यात तपासाच्या सुचना दिल्यात.

त्यानुसार सफौ अशोक महाजन, शरीफद्यीन काझी, युनुस शेख, सुरज पाटील, कमलाकर बागुल, दादाभाऊ पाटील, चालक ईद्रिस पठाण यांना भादली गावात संशयित आरोपी विजय अशोक कोळी (वय-22) रा.ज्ञानेश्वर मंदीराजवळ भादली ता.जि.जळगाव हा चोरीची दुचाकी बनावट नंबर टाकुन वापरत असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पथकाने भादली येथे जावून विजय कोळी याला ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातील चोरीची सायकल क्रमांक (एमएच १९ एस ९९) मिळून आली. सदरील दुचाकी ही जळगावातील बी.जे.मार्केट येथून दिवसा चोरी केल्याचे कबुल केले. सदरील दुचाकी चोरीबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशन भाग ५ गुरनं. १६८/२०१९ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पुढील कार्यवाहीकामी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे २० हजार रूपये किंमतीच्या मोटार सायकलसह हजर केले आहे.

Protected Content