जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या नजीक असलेल्या गोलाणी मार्केट परिसरात आज रविवारी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या पुढाकाराने विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकुण २४ टनक कचरा उचलण्यात आला. हा कचरा ७ पिकअप व १ ट्रॅक्टरच्या एकूण बारा ट्रिपमध्ये मनपा कचरा डेपो येथे पोहोचवण्यात आला. यावेळी परिसरात प्लास्टीक कॉरीबॅग वापरणाऱ्या विक्रेत्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

फुल विक्रेते गोरख अमृत काटोले, केक पॅलेस आणि जैन प्लास्टिक यांच्याकडून अनुक्रमे १० किलो, १० किलो आणि ३० किलो प्लास्टिक कॅरी बॅग जप्त करण्यात आल्या. त्यांच्यावर प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारून एकूण १५ हजार रुपये दंड आकारण्यात आला.
या मोहिमेचे नेतृत्व सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, आरोग्य निरीक्षक मनोज पाटील, रुपेश भालेराव, मनोज राठोड, विशाल वानखेडे, प्रदीप धापसे, आकाश पाटील, देवयानी भदाणे, संघमित्रा सपकाळे, उज्वल बेडवाल, मंगेश भदाणे, सतीश करोसिया, मुकादम रवी संकत, आनंद मरसाळे, विशाल चांगरे, शरद पाटील, भगवान तायडे, राजेंद्र ठाकूर, राजेंद्र निळे, भीमराव सपकाळे, मयूर सोनवणे, जगन्नाथ पाटील, किशोर भोई, राहुल निधाने, राहुल पवार, दीपक भावसार, वालिदास सोनवणे, विकी डोंगरे, इमरान भिस्ती, शंकर आंबोरे यांसह इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
या मोहिमेद्वारे गोलाणी मार्केटच्या स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सिंगल युज प्लास्टिकवर कठोर कारवाई करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेशही यातून देण्यात आला आहे.