यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : तालुक्यातील वड्री या गावात शेत गट क्रमांक ८९ जवळ हडकाई नदीच्या पुलाचे काम सुरू होते. तेथे यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे अभियंता हे गेले होते. तेव्हा त्यांच्याशी चार जणांनी वाद घातला. आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वड्री ता. यावल या गावाच्या शेत शिवारात शेत गट क्रमांक ८९ जवळ हडकाई नदी आहे. येथे पुलाचे काम झाले आहे. व उर्वरित काम या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान त्या कामा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यावल येथील सहाय्यक अभियंता केतन अशोक मोरे हे गेले होते. तेव्हा तेथे त्यांच्यासोबत संजय रशीद तडवी, शकील रशीद तडवी, रशीद रमजान तडवी यांचे नातू आणि रशीद रमजान तडवी यांची पत्नी या चार जणांनी वाद घातला. त्यांना शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की केली. तेव्हा या प्रकरणी केतन मोरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.
