स्पार्क फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

56f1b1ed 1ea5 4771 86ca e0739dd893a9

अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्पार्क फाउंडेशनच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वही-पेन साहित्याचे आ.शिरीष चौधरी व आ.सौ.स्मिता वाघ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सुमारे २०० विद्यार्थ्यांनी वही व शैक्षणिक साहित्य वाटपाचा लाभ घेतला. ईद मिलान कार्यक्रमानिमित शिरखुरम्याचाही आस्वाद यावेळी घेण्यात आला.

‘आजच्या काळात वही, पेन हेच आपले शस्त्र आहे’ असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आ.स्मिताताई वाघ यांनी सांगितले. तर स्पार्क संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त वर्षभर केलेल्या सामाजिक कार्याचे व अध्यक्षांचे कौतुक आ.शिरीष चौधरी यांनी केले. यावेळी ईद मिलान कार्यक्रमात सहभाग घेत शिरखुरम्याचा आस्वाद उपस्थित मान्यवरांनी घेतला. पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांचे हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे तर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. स्पार्क संस्थेच्या कामाची व्हिडीओ क्लिप उपस्थितांना दाखवून महाराष्ट्राबाहेरही स्पार्क शस्त्र प्रदर्शन भरवेल असे
प्रास्ताविकात अध्यक्ष पंकज दुसाने यांनी सांगितले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी ,’स्पार्क ने ऐतिहासिक शस्र प्रदर्शनाच्या माध्यमातून इतिहास नविन पिढीपर्यंत पोहचविण्याचे वसा हाती घेतला आहे’ असेही सांगितले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून न.प.गटनेते प्रविण पाठक, प्रस्तावित जिजाऊ सूत गिरणीचे व्हाईस चेअरमन किरण गोसावी, योग शिक्षिका प्रतिभा पाटील, खा.शि.मंडळ उपाध्यक्षा माधुरी पाटील, अॅड.तिलोत्तमा पाटील, पत्रकार जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, आबीद शेख, योगेश कापडणे, युथ सेवा फाउंडेशनचे रियाझ मौलाना, रजा फाउंडेशनचे अध्यक्ष अकलाक, भाजप अध्यक्ष शितल देशमुख, श्रीमती लता दुसाने, फैय्याज मास्टर, पोलिस प्रशिक्षक सौ.मेघा जोशी, सौ.नेहा देशपांडे, सौ.निशा दुसाने, सौ.विद्या हजारे, सौ.अपेक्षा पवार, सौ.शितल सावंत, सौ.रेखा मोरांणकर, सौ.नीलिमा पुरकर आदिंसह मोठया संख्येने मान्यवर व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पार्क फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज दुसाणे, उपाध्यक्ष डॉ.हर्षल दाभाडे, सचिव प्रशांत जगदाळे, आनंद माळी, विजय पाटील, उमेश पाटिल आदिनी परिश्रम घेतले. त्यांना रॉयल उर्दू हायस्कुल व ज्यू कॉलेजच्या शिक्षकांनी सहकार्य केले.

Protected Content