सोयगाव बस स्थानकात सुविधांची वानवा

सोयगाव प्रतिनिधी । येथील बस स्थानकात असुविधा पसरल्या असून याचे कधी निराकरण करण्यात येईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत वृत्त असे की, सोयगावला नगर पंचायतीचा दर्जा असून,तालुक्याचे बस स्थानक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयगाव बस स्थानकाला मात्र अद्याप सुविधांचे स्वातंत्र मिळालेले नाही. या बस स्थानकाच्या नियंत्रण कक्षातील दुरध्वनीही बंद झालेला असून वीज पुरवठा असूनही नियंत्रण कक्षासह बस स्थानकात दिव्याआभावी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. बस स्थानकात रात्रीच्या वेळी महिलांना अंधारातच उभे राहावे लागत आहे. तसेच,बस स्थानकाच्या नियंत्रण कक्षातील दूरध्वनी जोडणी खंडित झाली असल्याने प्रवाशांना बस च्या चौकाशीपासून वंचित रहावे लागत आहे. बस स्थानकात बसेसच्या मार्गाची माहिती मिळत नाही. ध्वनिक्षेपक बंद आहे त्यामुळे ऐन सण सुदीच्या काळात महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. या असुविधा तातडीने दूर करण्याची मागणी होत आहे.

Protected Content