रावेरात अवैध रेशन धान्यसाठ्यांवर पुरवठा विभागाची कारवाई

रावेर प्रतिनिधी | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रावेर शहरात ठिकठिकाणी रेशन साठयात गहू, मका अवैध पध्दतने खाजगी गोडाऊंमध्ये ठेवल्याने रात्री उशिरापर्यंत जिल्हापुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी व तहसीलदार उषारानी देवगुणे यांच्या टीमची छापे-मारी सुरु केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

विश्वनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर शहरात गरीब जनतेचा रेशन धान्यसाठाचा गहू, मका अवैध पध्दतीने साठवून ठेवलेल्या काही गोडावुन पुरवठा विभागाची छापे -मारी सुरु आहे.यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या टीममध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी व रावेर तहसीलचे अधिकारी कर्मचारी सहभागी आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत शहरात सर्वत्र रेशनच्या मालाची झाडाझडती सुरु होती. पंजाब व हरियाणा राज्यातुन महाराष्ट्रतील गरीब जनतेला वाटण्यासाठी आणनेला गहू मका जप्त केल्याचे अजुन वृत्त आहे.

Protected Content