शिवसेनेचा मोठा गट भाजपसोबत येणार- रवी राणांचा दावा

0Shivsena Bjp 45

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेत फुट पडून मोठा गट भाजपसोबत येणार असल्याचा दावा बडनेरा येथील अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.

आमदार रवी राणा आणि त्यांच्या सौभाग्यवती खासदार नवनीत कौर राणा यांनी आधीच भाजप व राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला होता. नवनीत कौर यांनी तर फडणवीस अगदी रात्रीतून सरकार बनवतील असे म्हटले होते. जे अक्षरश: खरे झाले. या पार्श्‍वभूमिवर, आज रवी राणा यांनी येत्या काही दिवसातच शिवसेनेत फुट फडणार असल्याचे भाकीत केले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेचा एक मोठा गट भाजपला जाऊन मिळणार आहे. तर शरद पवारदेखील भाजपलाच पाठींबा देतील. रवी राणा यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content