चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील सोनगाव शिवारातील शेतातून गाय व चार बैल यांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममराज भाईदास जाधव रा. सोनगाव ता. चाळीसगाव हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे सोनगाव शिवारातील शेतात पत्र्याचे शेड आहे. त्या ठिकाणी त्यांनी एक गाय आणि चार बैल बांधलेले होते. १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गुरांना चारा टाकून ते घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपये किंमतीची १ गाय ४ बैल आणि एक किल्लारी जातीचा गोऱ्हा या गुरांची चोरी करून नेल्या आहे. 13 जुलै रोजी सकाळी शेतात आल्यावर त्यांना त्यांचे गाय बैल आणि गोऱ्हा दिसून आले नाही. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु कुठेही शोध पत्ता लागला नाही. अखेर सायंकाळी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन सोनवणे करीत आहे.