बनावट स्वाक्षरी करून १ लाख ८ हजारात फसवणूक

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बाम्हणे येथील साईदुध उत्पादकावरील सचिवाने परस्पर धनादेशवर बनावट सह्या करून दुध डेअरीच्या मालकाची १ लाख ८ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोविंदा रामदास पाटील (वय-६२) रा. बाम्हणे ता. एरंडोल यांचे गावात साई दुध उत्पादक सोसायटी आहे. त्या दुकानावर कैलास सदाशिव पाटील रा. बाम्हणे हा सचिव पदावर नियुक्त आहे. दरम्यान २६ जून रोजी गोवींदा पाटील यांच्या नावे असलेल्या धनादेशवर बनावट स्वाक्षरी करून १ लाख ८ हजार ४८२ रूपये परस्पर काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गोविंदा पाटील यांनी कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवून कैलास पाटील याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलीस ठाण्यात कैलास पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान सिंहले करीत आहे.

Protected Content