डीमार्टमध्ये दोन कुटुंबातील किरकोळ वादातून दगडफेक व तोडफोड; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखलचे काम सुरू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील डी मार्टमध्ये दोन ग्राहकांच्या कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून काही तरूणांनी गोंधळ घालून डीमार्टवर दगडफेक व लाकडी दांडक्याने तोडफोड केल्याची घटना बुधवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या पोलीस कर्मचारी जखमी झाले असून काही तरूणांना ताब्यात घेत आहे. रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मोहाडीरोड वरील डी मार्ट येथे बुधवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन कुटुंब खरेदीसाठी आले होते. दोन्ही कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातचे रूपांतर थोड्यावेळात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे एका कुटुंबातील काही तरूणांनी डीमार्टमध्ये तोडफोड करण्यात आली. यावेळी वातावरण तापल्याने कोणताही अनुचित प्रकार होवून नये म्हणून डीमार्टच्या व्यवस्थापकांनी डीमार्ट शटर बंद करण्यात आले.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात तोडफोडीच्या प्रयत्नात असलेल्या तरूणांना समजविण्याचा प्रयत्न करत असतांना एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील मारहाण केल्याने मोठा गोंधळ उडाला. पोलीसांनी याती काही तरूणांना ताब्यात घेतले आहे.

तसेच वाद झालेल्या दोन्ही कुटुंबियांना रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. डीमार्टमध्ये झालेल्या गोंधळामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर परिस्थीत आटोक्यात आल्यानंतर डी मार्ट मधील इतर ग्राहकांना एक-एक करून सोडण्यात आले.

रामानंद नगरपोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही कुटुंबियांच्या सदस्यांसह इतर नातेवाईकांची मोठी गर्दी पहायला मिळाले. दरम्यान सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात येवून चौकशी करत आहे.

Protected Content