अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोघांवर पथकाची कारवाई

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतून करणाऱ्या दोन जणांना पोलीसांनी कारवाई केली आहे. दोन्ही वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार प्रविण चव्हाणके यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील नगरदेवळा व पुनगाव शिवारात दोन अवैध वाळू वाहतूक करतांना पतकातील अव्वल कारकून वरद वाडेकर, पुरवठा निरीक्षक अभिजित येवले, तलाठी आर. डी. पाटील, आशिष काकडे, शिवाजी डोंगरे, सुनिल राजपूत या पथकाने कारवाई करुन वाहने तहसिल कार्यालयात जमा केली. तालुक्यातील पुनगांव येथील नदीपात्रातून व नगरदेवळा येथील अग्नावती नदीपात्रातून प्रत्येकी एक ब्रास वाळू वाहतूक करतांना विना नंबर असलेल्या ट्रॅक्टर आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. पुनगांव येथील मनोज भावलाल राजपूत व नगरदेवळा येथील आशिष युवराज कोळी यांच्या मालकीचे वाहने असल्याचे सांगण्यात आले.

Protected Content