पाचोऱ्यात झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा (व्हिडीओ)

43d55581 175b 4f1c 84ca 22da1ed0b90e

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील पुरोगामी विचारांचे हिंदू-मुस्लिम समाज बांधवांनी झारखंड राज्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी भव्य मोर्चा काढला होता.

 

झारखंड राज्यातील रहीवाशी असलेल्या तबरेज अन्सारी याला भरचौकात अमानुष अत्याचार करून ठार करण्यात आले. या घटनेने मानवताही हादरून गेली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा शहरातील पुरोगामी विचार सरणीचे राजकीयसह बिगर राजकीय हिंदू-मुस्लिम समाजाने मोर्चा हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा समारोप प्रसंगी अजर खान यांनी प्रास्ताविक केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ, कॉग्रेस सरचिटणीस सचिन सोमवंशी, खलिल देशमुख, रसुल उस्मान, सुनिल शिंदे, विकास पाटील यांनी समयोचित भाषणे केली. मोर्चात माजी नगराध्यक्ष नसिर बागवान, अमजद पठाण, एजाज बागवान, आरीफ खान, मुक्तार शहा,रणजित पाटील आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.

Protected Content