Home Cities भुसावळ बाजारपेठ पोलिसांतर्फे दारुसाठा नष्ट

बाजारपेठ पोलिसांतर्फे दारुसाठा नष्ट

0
70
daru satha
daru satha


daru satha

भुसावळ प्रतिनिधी । येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. देविदास पवार यांनी प्रोव्‍हीजनच्या दाखल विविध गुन्ह्यातील जप्त केलेला दारूसाठा नष्ट करण्यासाठी न्यायालयात केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून न्यायालयाच्या आदेशानंतर हा दारूसाठा (दि.२ जुलै) रोजी दुपारी पोलीस लाईन भागात नष्ट करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध दाखल प्रोव्‍हीजन गुन्ह्यातील सुमारे तीन वर्षांपासून जप्त केलेला दारुसाठ्‍याचा मुद्‍देमाल पोलीस ठाण्यात होता. पोलीस निरीक्षक पवार यांनी सदर दारुसाठा लवकर नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे (दि.२ जुलै) रोजी पोलीस लाईन भागात देशी-विदेशी दारू व बिअर असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल जमिनीत पुरून नष्ट करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाघ, एएसआय.एजाज पठाण, युवराज नागरूत, नरेंद्र चौधरी आदी उपस्थितीत होत.


Protected Content

Play sound