अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराजवळील खेडी गावानजीक भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघतात जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता याप्रकरणी बुधवारी मआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकेश प्रकाश खडके (वय-२८, रा. विठ्ठल पेठ, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, लोकेश खडके हा तरूण जुने जळगावातील विठ्ठलपेठ परिसरात वास्तव्याला आहे. १७ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव शहराजवळील खेडी गावाजवळून दुचाकी (एमएच १९ बीपी ५००) ने जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत लोकेश हा गंभीर जखमी झाला होता. त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला नशिक येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, २९ जून रोजी लोकेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Protected Content