मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर आरोपांमागून आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावल्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, त्यांच्या आयएनएस विक्रांत प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण मागितलं होतं. मात्र त्यांना कोणतेही संरक्षण मिळालं नाही. सोमय्यांनी जो पैसा गोळा केला त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलावर आहे.
किरीट सोमय्या यांच्याबाबत आज सकाळी युक्तीवाद झाला. त्यांनी जी कागदपत्र सादर केली त्याद्वारे गुन्हा कबूल केल्यासरखं आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. तर, . आपण याविरोधात आता हायकोर्टात धाव घेणार आहे. आत्ताच या प्रकरणात काही सांगता येणार नाही, अशी माहिती किरीट सोमय्यांच्या वकिलांनी दिली आहे. तसेच आज फक्त किरीट सोमय्या यांचा जामीन फेटाळला आहे. नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनवाणी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
दरम्यान, सोमय्या यांचा अटकपूर्व फेटाळल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सोमय्या आणि त्यांच्या पुत्राची अटक अटळ असल्याचा दावा केला आहे. भाग सोमय्या भाग अशा शब्दांमध्ये त्यांनी खिल्ली देखील उडविली आहे.