एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील पद्मालय फाट्याजवळील उत्तमनगरमधील रहिवाश्यांना शासनाच्या नियमानुसार गावठाण जागा नमुद करुन कायम करणेची मागणी, गावठाण जागा निश्चित करून प्रत्येक ग्रामस्थाला जागा नमूद करुन मोजून देण्याबाबत तसेच खालील नागरी समस्या सोडण्याबाबत राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही जवळपास ७० ते ७५ कुटुंब उत्तम नगर , पद्मालय फाटयाजवळ, एरंडोल येथे सन 2010 पासून वास्तव्यास असून सर्वच कुटुंब हे हातमजुरीवर आपला उदरनिर्वाह करीत आहोत. येथील प्रत्येक ग्रामस्थाला दारिद्रय रेषेखालील यादीत समाविष्ट करावे तसेच आम्हाला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसून स्वस्त धान्य व अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडवावा, महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था व्हावी, रस्ते, गटारी यांची व्यवस्था व्हावी, अंगणवाडीची व्यवस्था होवून गरोदर मातांसाठी पोषण आहाराचे नियोजन व्हावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच अधिकार्यांनी समक्ष चौकशी करुन समस्यांची पडताळणी करावी आणि चौकशी अहवाल तयार करुन शासनास सादर करावा व आमच्या समस्या सोडवाव्यात असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदनावर मांगीलाल पावरा, लालसिंग पावरा, शरद पावरा, सुरेश पावरा, धनसिंग पावरा, सुनिल पावरा, मुकेश पावरा, विक्रम पावरा, करमसिंग पावरा, कैलास बारेला, ओेंकार पावरा, रमेेश बारेला, दिपक पावरा, बलसिंग पावरा, संयम पावरा, अनिल बारेला, जगदीश पावरा, दिनेश पावरा, मुकेश शरद पावरा, मुनेश पावरा, राजू पावरा, दिनेश पावरा, भुरलाल पावरा आदींच्या सह्या आहेत.