राजस्थानी विप्र संघटनेकडून समाजसेवक रोहित महाले यांचा सत्कार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाजसेवा करणाऱ्या गोरक्षकांचा समावेश शहरातील राजस्थानी विप्र संघटना तर्फे दिनांक 18 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत पंचरंगी कार्यक्रम घेण्यात येत आहे. भुसावळ मध्यवर्ती भागातील सराफ बाजार भजीया गल्ली जाम मोहल्ला परिसरात गौसेवक रोहित महाले व त्यांचे सहकारी यांचे श्री रामल्लला स्थापनानिर्मित सत्कार करण्यात आला आहे.

गौसेवक गाईला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवितात व त्यांचे कत्तल थांबवण्यासाठी अथक असे प्रयत्न करतात व देशभक्तीचे जान ठेवतात गौमाता म्हणजे भारताची अस्मिता वाचण्याचे कार्य महाले करतात तसेच महाले व त्यांचे सहकारी मित्र भुसावळ परिसरातील अनाथ गोरगरीब आजारी जखमी व्यक्तीला सरकारी रुग्णालयात दाखल करून तेथील डॉक्टरांच्या भेटी घेऊन त्यांना योग्य ते औषध उपचार मिळवून देतात. म्हणून महाले यांना गौरवस्पद अनाथाचे वाली सच्चे गौसेवक म्हणून संबोधले जाते.

रोहित महालेंनी भाषणाच्या सुरवातीला म्हटले ज्यांचे गुरू बलवान त्यांचा शिष्य पहेलवान आपल्या गुरुचे नाव घेताच टाळ्या कडाडल्या. गौरक्षक गुरुवर्य मिथुनजी साहेब, बारसे गब्बरजी भाऊ चावरीया साहेब, जीतुजी भाऊ जाट साहेबांमुळे तालमीत गोमाता सेवेचे तसेच लोकांना वाचविण्याचे धडे गिरवले असे गौसेवक मत रोहित महाले यांनी मांडले.

रोहित महाले यांचा सत्कार राजस्थानी विप्र संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा तसेच बबीता शर्मा यांनी केले. याप्रसंगी यांच्या गौशाळेमध्ये जाऊन गाईला चारा देण्यात आला व सत्कारमूर्ती समाजसेवक गब्बर चावरीया गोरक्षक, जितु पवार जाट, रोहित महाले, सोनू टाक, बबलू धायडे, गणेश चौधरी, विशाल गेंगट, दीपक सुरडकर, किरण पाटील, दिनेश अंडायेंगे, रोहन धोसेले, तुषार धोसेले, कुलदीप लोडते, मयूर सावकारे, सचिन बडगे, राहुल बाविस्कर, अर्जुन गेंगट व अन्य गौरक्षकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बबीता शर्मा या होत्या. याप्रसंगी वसंत गाडगे, प्रशांत शर्मा, चेतन शर्मा, यश अग्रवाल, कृष्णा शर्मा, दीपक शर्मा, राम अहिरे, नवीन शर्मा, नितीन शर्मा, कैलाश उपाध्याय, पंडित विनोद जोशी, सत्यनारायण शर्मा, स्वप्निल साळवे, सिद्धेश शर्मा, कार्तिक शर्मा, सुनील ठाकूर व अग्रवाल नवयुग मंडळाचे अध्यक्ष गोकुळ अग्रवाल महिलांमध्ये उषा शर्मा, सोनल शर्मा, पूजा शर्मा, पिंकी शर्मा, पूजा चौरसिया इतर बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश शुक्ला यांनी केले तसेच स्वागत गीत देशपांडे यांनी केले

Protected Content