पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सामनेर येथील रंभाई मातेची यात्रेसं भेट देवून सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पाटील दर्शन घेतले.
आज दि. ९ आॅक्टोबर रोजी दोनशे वर्षांपासून परंपरागत यात्रोत्सव साजरा करण्या आला. यावेळी रंभाई मातेचे पूजन चव्हाण परिवार करत असून दरवर्षीही यात्रा कोजागिरीच्या रात्री निघत असून उत्साह पूर्ण होत आहे. यावर्षी या यात्रेसाठी पाचोरा तालुक्याचे सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पाटील यांनी भेट देऊन तसेच रंभाई मातेची आरती करून दर्शन घेतले. यात्रेमध्ये उत्साह वाढविला. यावेळी त्यांच्यासोबत सामनेर येथील व परिसरातील असंख्य महिला वर्ग, भाविकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.