सामाजिक कार्यकर्ते जानकीराम पांडे यांच्या पुढाकाराने कामगारांची मुक्तता !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सामाजिक कार्यकर्ते जानकीराम पांडे यांच्या पुढाकाराने ऊस तोड कामगारांची कारखानदारांच्या तावडीतून मुक्तता करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथील तीन तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील भटक्या विमुक्त समुदायातील १५ मजुरांची कारखानदाराच्या तावडीतून सामाजिक कार्यकर्ते जानकीराम पांडे यांच्या पुढाकारणे सुटका करण्यात आली. ऊस तोडी साठी गेलेले भटके विमुक्त जमातीतील धामणगाव येथील तीन मजूर तसेच चौघा अल्पवयीनांसह बुलढाणा जिल्ह्याच्या गीलोरी गावचे पंधरा मजूर यांना साखर कारखानदार व मुकादम यांच्या संगनमताने अडकून ठेवण्यात आले होते. दिलेले पैशाच्या मोबदल्या पेक्षा अधिक काम होऊनही मजुरांना मजुरीचे पैसे ही दिले जात नव्हते. आणि त्यांचा रोजचा हिशोब सुद्धा ठेवला जात नव्हता. त्यांना घरीही जाऊ देत नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने सदर मजुरांनी सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय बलुतेदार विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, तथा बेलदार समाजाचे राज्य अध्यक्ष जानकिराम पांडे यांचा पुतण्या विनोद पांडे यांच्या कानावर व्यथा घातली. त्यांनी ही बाब जानकीराम पांडे यांना सांगितली.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते जानकिराम पांडे यांनी विनोद पांडे व अमोल कटोने या कार्यकर्त्यास घेऊन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून साखर कारखानदार व मुकादम यांच्या संगनमताने अडकवून ठेवलेल्या मजुरांची तिथे जाऊन सुटका केली. या १८ जणांपैकी ४ जण अल्पवयीन असूनही कारखानदारास त्यांची येत कीव येत नव्हती.परंतु मजुरांना जानकीराम पांडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल कल्पना होती. कारण त्यांनी २०१९ मध्ये याच मजुरांपैकी त्यावेळेस इयत्ता आठवीत शिकत असलेला मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी असलेल्या मुलास धोपेश्वर देवस्थान तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथून मुंगीचे औषध टाकून त्यावेळी हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे अपहरण करून नेले होते.व बांधून ठेवले होते आणि दोन जिल्ह्याच्या पोलिसांनी सुटका होत नसताना त्याही वेळेस जानकीराम पांडे यांच्या कानावर विषय आला असता त्यांनी अशाच हुशारी,बुद्धी कौशल्य व वजन वापरून या अल्पयीन बालकाची सुखरूप सुटका केली होती.

ही गोष्ट माहीत असल्याने मजुरांनी जानकीराम पांडे यांच्या पुतण्याशी संपर्क करून त्यांना सुटका करण्याची विनंती केली असता सर्व कामे बाजूला सोडून तात्काळ जानकीराम पांडे यांनी पंढरपूर गाठून त्याच दिवशी रात्री कारखानदाराने अडकवून ठेवलेल्या मजुरांस प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मजुरांची खाजगी वाहनाने सुटका केली. एवढेच नव्हे तर त्यांना घरपोच पोहचवून देण्याची व्यवस्था सुद्धा केली. सुटका केलेल्यांमध्ये लखन धारू राठोड,राम धारू राठोड,विलास हारलाल चव्हाण, दिलीप हरलाल चव्हाण,भूरलाल चव्हाण,करिश्मा लखन राठोड,अर्चना विलास चव्हाण,रुपेश मानसिंग,गीताबाई पवार,मानसिंग लक्खु पवार,उत्तम चव्हान,भारताबई उत्तम चव्हाण, वर्ष,ममराज चव्हाण आदींसह इतरांचा समावेश होता. भीषण परिस्थितीतून सोडवून आणले.घरी पोहोचल्यावर त्यांच्या परिवारास आनंदाश्रू आले. या सर्वांनी जानकीराम पांडे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Protected Content