पाचोरा येथील सर्पमित्र विजय पाटील यांनी तब्बत ४० हजार सर्पांना दिले जीवनदान (व्हिडीओ)

पाचोरा नंदू शेलकर । पाचोरा शहरातील विजय पाटील यांना वयाच्या १८ व्या वर्षा पासूनच निर्सगाची आवड आहे. परिसरात मामा म्हणुन प्रसिद्ध असेलेले विजय पाटील यांना सर्पांविषयी आत्मियता निर्माण झाली तेव्हापासून ते आजपर्यंत विजय पाटील यांनी विविध जातींचे सुमारे ४० हजार सर्प वेगवेगळ्या ठिकाणाहुन सुखरुप पकडले आहेत. 

पकडलेल्या सर्पांना जंगलात सोडुन जीवनदान दिले आहे. विशेष म्हणजे विजय शंकर पाटील (मामा) हे सर्प पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता ही सेवा करत आहेत. विजय पाटील यांनी त्यांच्या अविरत सेवेत आज पर्यंत शहरातील अंकीत काॅटन मध्ये साडेसात फुटाचा कोब्रा नाग सुरक्षित पकडुन त्याला जीवनदान दिले आहे. विजय पाटील यांनी जनतेला आवाहन करत सांगितले की, साप हा आपला शत्रु नसुन मित्र आहे. साप हा एक अतिशय भित्रा सरपटणारा प्राणी असुन जो पर्यंत तुम्ही त्याला त्रास देणार नाही तो पर्यंत तो तुम्हाला ईजा पोहचविणार नाही. त्यामुळे सापाला घाबरु नये अथवा त्यास मारु नये वर्षातील ३६५ दिवसात आपण साप दिसल्यास त्याला मारतो व नागपंचमीच्या दिवशी त्याच सर्पांची पुजा करतो त्यामुळे सापांना कोणीही मारु नये. आपल्या परिसरात किंवा घरात साप निघाल्यास त्या – त्या परिसरातील सर्पमित्रांना कळवावे असे आवाहन केले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीस सापाने दंश केल्यास त्याने अघोरी विद्येकडे न वळता दंश केलेल्या जागेजवळ रुमाल किंवा दोरीने बांधून सरळ सरकारी दवाखान्यात उपचार घ्यावेत.

 

Protected Content