पोलीस भरतीच्या विविध प्रक्रियेसाठी महापोर्टलवर पासवर्ड बदलने गरजेचे- एसपी डॉ. प्रविण मुंढे (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलाकडून २०१९ या वर्षासाठीची १२८ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसह विविध प्रकियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना महापोर्टलवर जावून आपला पासवर्ड बदलणे गरजेचे असून पासवर्ड बदलण्याकरीता आता २२ ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे अशी माहिती  पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक मुंढे यांनी त्यांच्या दालनात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पोलीस भरती प्रकियेबाबत माहिती दिली. जिल्हा पोलीस दलात २०९ या वर्षासाठीची १२८ जागांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. १२८ जागांसाठी तब्बल २२ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. न्याय कम्युनिकेशन या कंपनीअंतर्ंगत पोलीस दलाकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मराठा तसेच एसईबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे अशा उमेदवारांसाठी ज्यांच्याकडे ईडब्लूएसचे महसूली प्रमाणपत्र असेल त्यांनी ईएब्लूएसचा किंवा खुला हा प्रवर्ग निवडावा. असेही डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. 

मेदवारांना सोयीचे व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष निर्माण करण्यात आला असून काही समस्या असल्यास उमेदवारांनी मोबाईल क्रमांक ९८२१६६५६९३ तर ०२५७ २२३३५६९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. 

Protected Content