धुमस्टाईल सोनसाखळी लांबविणार्‍या टोळीचा पर्दाफाश; मुद्देमालासह तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यासह पुणे, धुळे, हडपसर, कल्याण, कराड अशाप्रकारे राज्यभरात धुमस्टाईल सोनसाखळी लांबविणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. चोरीचा माल खरेदी करणाऱ्यासह तिघांना तीन महागड्या दुचाकींसह अटक केली आहे. 

आकाश ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी रा. प्रजापत नगर व अमोल उर्फ रामेश्‍वर राजेंद्र अहिरे रा. विठ्ठलपेठ, गोपाळपूरा जळगाव यांच्यासह \चोरीचे सोने खरेदी करणारा दिपक शिवराम भडांगे रा. ज्ञानदेव नगर, श्रावण कॉलनी जळगाव अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहे. 

गेल्या वर्षभरात सोनसाखळी चोरीचे ३० गुन्हे प्रलंबित होते. यात आणखी गुन्हयांची भर पडत होती. विशेष पोलीस महानिरिक्षकांकडून यांची गंभीर दखल घेण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा गेल्या दोन महिन्यांपासून कामाला लागली होती. या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणचे १८ गुन्हे उघडकीस आणून ६ लाख २५ हजारांचे १३९ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. अशी माहिती आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव शहरात गेल्या काही वर्षापूर्वी बिग बाजार येथून सात ते आठ एलईडी टीव्ही चोरुन नेल्याच्या घटनेत तेथेच काम करणार्‍या आकाश सुर्यवंशी यास अटक करण्यात आली होती. त्यानुसार जळगावातील आकाश यांच्यासोबत अमाोल अहिरे याचा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची पक्की खबर स्थानिक गुन्हे शाखेतील परेश महाजन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती दिली. बकाले यांनी परेश महाजन यास आकाशच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना देत, याच गुन्ह्यातच्या तपासात पोलीस उपनिरिक्षक सुधाकर लहारे, विजयसिंग पाटील, सुधारक अंभोरे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, नरेंद्र वारुळे, सहाय्यक फौजदार विजय देवराम पाटील, जयंत चौधरी, पोलीस नाईक सविता परदेशी यांच्यासह इतर कर्मचार्‍यांचे पथक तयार करुन विविध ठिकाणी रवाना केले. पथकाने ८ मार्च रोजी पुण्यातून आकाश सुर्यवंशी याच्या पाठोपाठ अमोल अहिरे या दोघांच्या मुसक्या आवळल्या.  आकाश व अमोल या दोघांनी चौकशी सागर राजेंद्र चौधरी या साथीदाराचेही नाव सांगितले. सागर चौधरी हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. अतिशय सफाईदार पणे व वेगवान पध्दतीने १४० किमी प्रतीवेगाने दुचाकी चालविण्यात तरबेज आहे. ज्याठिकाणी नागरिक मॉर्निक वॉक करतात, अशा ठिकाणी रेकी करायची. 

परिसराची भौगोलिक माहिती, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे अशी खात्री करुन मग संशयित मोहिम फत्ते करत होते.  आकाश, अमोल व सागर चौधरी हे तिघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. तिघेही एकादिवशी जळगावात फिरत असतांना त्यांच्यासमोर धुमस्टाईल सोनसाखळी चोरीची घटना घडली. अतिशय सोप्या पध्दतीने हा गुन्हा आपणही करुन खूप पैसे कमवू शकतो, या उद्देशाने तिघेही प्रवृत्त झाले. अशापध्दतीने तिघांनी गेल्या वर्षीय  जळगाव शहर, भुसावळ, चोपडा शहर, रावेर, अमळनेर, मुक्ताईनगर,  चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, भडगाव, पहूर या बरोबरच धुळे, खामगाव, पुणे, हडपसर, कल्याण, कराड अशाप्रकारे राज्यभरात गुन्हे गेले. गेल्या वर्षात एकट्या जळगाव जिल्ह्यात ३० सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले आहेत तर राज्यभरातील गुन्ह्याचा आकडा मोठा आहे. जिल्हयातील ३० पैकी १८ गुन्ह्यांची संशयितांनी कबूली दिली असून त्यात १३९ ग्रॅम सव्वा लाखांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यातील एम.एच.१९ डी.एन.७०७०, एन.एच.१९ डी.ए.३१२० व एम.एच. १९ डी.ई.४०२२ अशा तीन महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

 

Protected Content