बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी अपशब्द वापरल्याचा येथे भाजप पदाधिकार्यांनी निषेध केला.
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) नेते आ. एकनाथराव खडसे यांनी काल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला मोर्चा सर्व आघाड्या व प्रकोष्ट बोदवड तालुक्याच्या वतीने बोदवड शहरात टांगा स्टॅन्ड येथे भाजपा बोदवड तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, जळगाव जिल्हा पूर्व सरचिटणीस सौ . वैशालीताई कुलकर्णी, युवा मोर्चा बोदवड शहर अध्यक्ष अभिषेक झाबक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी जळगाव जिल्हापूर्व चिरणीस परमेश्वर टीकारे, जिल्हा कार्यकारणी सदस्य भागवत चौधरी, जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ. अनिताताई अग्रवाल, युवा मोर्चा जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष राम आहुजा, जळगाव जिल्हापूर्व अभियंता सेल चे जिल्हा-संयोजक अमोल शिरपूरकर , बोदवड तालुका उपाध्यक्ष विक्रम पाटील, सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे , बोदवड शहर सरचिटणीस वैभव माटे, युवामोर्चा बोदवड शहर उपाध्यक्ष राहुल माळी व सागर गंगतीरे, बोदवड शहर संपर्क प्रमुख मधुकर पारधी, भाजपा विस्तारक उमेश गुरव , तालुका सोशल मीडिया प्रमुख रोहित अग्रवाल, सुनील आसटकर, संजय अग्रवाल, सुनील माळी, रोशन पाटील यांचेसह भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहर चे सर्व प्रदेश, जिल्हा, नगरसेवक, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा/आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.