Home Cities चोपडा धानोरा येथील डॉ. आंबेडकर अभ्यासिकेला प्रतिमा भेट

धानोरा येथील डॉ. आंबेडकर अभ्यासिकेला प्रतिमा भेट

0
35

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । येथे लोकसहभागातुन सुरु करण्यात आलेल्या डॉ बी. आर. आंबेडकर मोफत अभ्यासिकेला मोक्षद अविनाश पाटील या विद्यार्थ्याने स्वत: तयार केलेली बाबासाहेबांची प्रतिभा भेट दिली.

इयत्ता दहावीत शिकणारा मोक्षद हा जळगाव येथिल प्रसिद्ध विधीज्ज्ञ अविनाश पाटील यांचा पुत्र आहे.त्याने पेन्सिलीच्या सहाय्याने स्वतः महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तयार करुन अभ्यासिकेस भेट दिली. यावेळी अ‍ॅड. अविनाश पाटील, क्रीडा शिक्षक देविदास महाजन, उपसंपादक अमोल महाजन, पत्रकार प्रशांत सोनवणे, अरुण कोळी (चुंचाळे), सुनिल कोळी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे तरुण उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात कदाचित पहीलीच अशी मोफत अभ्यासिका असावी की तेथे दीड लाख रुपये किंमतीची स्पर्धा परीक्षा पुस्तके, प्रेरणादायी पुस्तके, प्रश्‍नपत्रिका संच, मार्गदर्शिका,अभ्यासक्रम,मोफत ऑनलाईन फॉर्म भरुन देणे आदी सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे चोविस तास अभ्यासिका सुरुच असते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound