सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । विवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, येथील फर्जनबी खान या महिलेने दि. २४ रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. फर्झनबी हिचे माहेर रावेर तालुक्यातील अजंदा येथील असून माहेरहून रिक्षा घेण्यासाठी तसेच नंतर रिक्षाचे हफ्ते भरण्या साठी पन्नास हजार रुपये माहेरहून आणण्याची तिचे पती शेख अझहर खान अय्युब खान यांनी मागणी केली होती. या मागणीची पूर्तता न झाल्याने तिचे पती अझहर खान, सासू फाईमुदाबी अय्युब खान, तसेच नणंद सिरिनबी बाप अय्युबखान या तिघांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने याच्या जाचास कंटाळून राहते घरी गळ फास घेऊन जीवन यात्रा संपवली असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. याबाबत मयत फर्झनबी चे वडील शेख न्यामत शेख अहमद (वय ६२ राहणार अजंदा) यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिल्याने उपरोक्त तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक गणेश आखाडे, देवेंद्र पाटील, ए.सी. सपकाळे, भाग्यश्री कोल्हे, अझहर खान पठाण आदी करत आहेत.