विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी कुलगुरू प्राध्यापक पी.पी.पाटील यांच्या दालनासमोर आज सोमवारी ८ फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन केले.

सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे, महासंघाच्या भ्रष्ट पदाधिकारीवर कारवाई झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेले होते. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्या स्वतंत्र कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजेच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.  कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाल सुरूवात झाली होती. या आंदोलनात उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, सचिव भैय्यासाहेब पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, दुर्योधन साळुंखे आदी पदाधिकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यापीठात ४५० कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी १४ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. तर ५७ कर्मचाऱ्‍यांनी पदनाम बदल प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्‍यांना तात्काळ सातवा वेतन लागू करण्यात यावा, अशी मागणी आज झालेल्या आंदोलनात केली आहे.

Protected Content