स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणीचे संस्थांना आवाहन

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या व विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविणाऱ्या व्हीटीपी-व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, व्हीटीआय-व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि नोंदणीच्या प्रतीक्षेत इच्छुक असणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थांनी स्कील इंडिया पोर्टलवर – ( TP-Training Provider & TC-Training Centre) नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोदणीच्या संपूर्ण प्रक्रियेत आपले  (TP- TC) हे Filly Accrediated & Fully Affiliated  होईल याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. आपली संस्था, सेंटरची स्कील इंडिया पोर्टलवर Fully Accrediated & Fully Affiliated म्हणून नोंदणी झाल्यानंतरच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध कोर्सेसचे प्रशिक्षण उमेदवारांना देता येईल. स्कील इंडिया पोर्टलवरील नोंदणी व इतर अनुषंगिक माहितीसाठी https://skillindia.gov.in या लिंकचा उपायोग करावा. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या संस्था, सेंटर यांनी स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन वि.जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

 

Protected Content