महापुरूषांबद्दल एकेरी उल्लेख; धार्मीक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील साईचंद्र नगर परिसरात महापुरुषांचे स्टेटस ठेवत एकेरी उल्लेख केल्याच्या कारणावरून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात बुधवारी १६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने प्रियदर्शी रंधे या तरुणाने स्टेटस ठेवले होते. या स्टेटसवर महापुरुष यांचा फोटो असल्याकारणामुळे संशयित आरोपी शुभम प्रकाश चौधरी रा. जुना सातारा रोड भुसावळ याने महापुरुषाबाबत एकेरी उल्लेख करत धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली. दरम्यान यासंदर्भात प्रियदर्शी याने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी शुभम प्रकाश चौधरी रा. जुना सातारा रोड या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव दमाड करीत आहे.

Protected Content