गायिका नेहा भसीनने केला अनू मलिकवर लैंगिक छळाचा आरोप

anu malik and neha bhasin

मुंबई, वृत्तसंस्था | ‘मी-टू’ चळवळीत लैंगिक शोषणाचे आरोप झालेला संगीतकार अनू मलिक पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रसिध्द गायिका नेहा भसीन हिने अनू मलिकवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. गायिका सोना मोहापात्रा हिने अलीकडेच अनू मलिक यांच्यावरील आरोपांच्या बातम्यांचे फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

 

‘जोपर्यंत निर्भयासारख्या घटना आपल्या देशात घडत नाही, तोपर्यंत लोक जागे होणार नाहीत का? अनू मलिक यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे मला शो सोडावा लागला होता. मी केलेल्या आरोपांमुळे अनू मलिक यांना प्रसिद्धी मिळाली, त्यासोबत त्यांच्या कार्यक्रमाला मोफत प्रसिद्धी मिळाली, असा आरोपही माझ्यावर करण्यात आला. या आरोपानंतर वर्षभरताच लैंगिक शोषणाचे आरोप झालेला हा व्यक्ती छोट्या पडद्यावर अगदी सहज परतला’ असे ट्विट तिने केले आहे.

सोना मोहापात्राच्या या ट्विटला गायिका नेहा भसीन हिने पाठिंबा दर्शवला आणि तिच्यासोबत झालेला प्रसंग शेअर केला. ‘मी तुझ्याशी सहमत आहे. अनू मलिक लैंगिक शोषण करणाराच आहे. अनू मलिकच्या विचित्र वागण्यामुळे मी वयाच्या २१ वर्षी स्टुडिओतून पळ काढला होता. स्टुडिओत सोफ्यावर आडवे पडून माझ्या डोळ्यांविषयी बोलत विचित्र हावभाव करायला लागल्यावर मी खोटं बोलून तिथून कसाबसा पळ काढला. माझी आई स्टुडिओखाली वाट पाहत थांबली आहे, असे मी सांगितले. त्यानंतर त्याने मला मेसेज, फोन करण्याचेही प्रयत्न केले, पण मी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. मी काम मिळेल या आशेने त्यांना माझ्या गाण्याची सीडी त्याला द्यायला गेले होते. आमच्या वयातील अंतर लक्षात घेऊन तरी अनू मलिकने असे वागायला नको होते.’ असेही तिने लिहिले आहे.

Protected Content