जळगाव प्रतिनिधी । तापी पाटबंधारे महामंडळाच्या स्थापने पासून जिल्ह्यात 80 प्रकल्प पुर्ण झाले असून या प्रकल्पाद्वारे 34.97 हेक्टर सिंचन क्षमता आणि 5.31 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामुळे आता सिंचन प्रकल्प योजनाच्या माध्यमातून संपुर्ण जिल्हा ओलिताखाली येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तापी महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येणारे भौगोलिक क्षेत्र २९.५८ लक्ष हेक्टर आहे. खानदेशातील तापी खोऱ्यातील जळगांव, धुळे, नंदुरबार व नाशिक (अंशतः) या चार जिल्ह्यांचे लागवडीलायक क्षेत्र एकूण १९.६५.२६२ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ८,४७.७३६ हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्मित करणे शक्य झाल आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावच्या स्थापने नंतर स्थापनेनंतर ४ मध्यम, ७१ लघू प्रकल्प, १ उपसा सिंचन योजना व ४ वाढ विस्तार कामे असे एकूण ८० प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. पूर्ण झालेल्या प्रकल्पाद्वारे ३४.९७२ हेक्टर सिंचन क्षमता व ५.३१ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला तर जून-२०१९ अखेर प्रगतीपथावरील व अवशिष्ठ कामांद्वारे एकूण १,७१,६२८ हेक्टर सिंचन क्षमता व ४६.६४ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला, पुर्ण झालेल्या, प्रगतीपथावरील व अवशिष्ठ कामांद्वारे माहे जुन-२०१९ अखेर एकूण २,०६,६०० हेक्टर सिंचन क्षमता व ५१.९५ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती दिली.
वाघूर मोठा प्रकल्पाला एकूण २२८८.३१ कोटी, हतनूर प्रकल्प टप्पा-१ मोठा प्रकल्प, वरणगांव तळवेल उपसा सिंचन योजना रु.८६१ कोटी व शेळगांव बॅरेज प्रकल्पास रु.९६८ कोटीची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नाबार्ड अंतर्गत मंजूर झालेले कामे
- नाबार्ड अंतर्गत मंजूर झालेल्या एकुण १५ हजार कोटी अर्थसहाय्यातुन जिल्ह्यातील खालील प्रकल्पांना निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे.
1) निम्न तापी मोठा प्रकल्प – १ हजार कोटी
२) वरणगांव तळवेल परिसर सिंचन योजना- ५०० कोटी
३) कुन्हा वढोडा इस्लामपुर उपसा सिंचन योजना- ५०० कोटी
४) बोदवड परिसर उपसा सिंचन योजन- ५०० कोटी
५) भागपूर उपसा सिंचन योजना- २००० कोटी
जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजना ना. महाजन यांच्या प्रयत्नातुन भागपूर उपसा सिंचन योजनेस नाबार्ड अंतर्गत मंजूर रु.१५ हजार कोटी अर्थसहाय्यातुन येत्या तीन वर्षासाठी 2 हजार कोटी निधीची तरतुद मंजूर करण्यात आली आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेती ओलिताखाली येणार आहे. प्रकल्पीय सिंचन क्षेत्र २७७७ हेक्टर, एकूण पाणीसाठा १९०.९० दलघमी (६.७४ टीएमसी) प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण ७४८ हेक्टर जमिनीपैकी २७९ हेक्टर (सुमारे ३७ टक्के) वनजमीन संपादीत करण्यात आली आहे, सन २०१९-२० साठी एकूण ९७ कोटीची तरतूद करण्यात आली असून अद्यावत खर्च रु.२४.०८ कोटी करण्यात आलं आहे.
निम्न तापी (पाडळसरे) मोठा प्रकल्प, ता.अमळनेर प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करुन एकूण २५६५७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणेसाठी मा.ना.श्री.गिरीषजी महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून सदर। प्रकल्पास नाबार्ड अंतर्गत मंजूर रु.१५००० कोटी अर्थसहाय्यातन रु.१००० कोटी निधीची तरतुद मजूर करण्यात आली.
वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेस नाबार्ड अंतर्गत मंजूर रु.१५००० कोटी अर्थसहाय्यातुन रु.५०० कोटी निधीची तरतुद मंजूर करण्यात आली आहे. कन्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस नाबार्ड अंतर्गत मंजूर १५ हजार कोटी अर्थसहाय्यातुन ५०० कोटी निधीची तरतुद मंजूर करण्यात आली आहे. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेस नाबार्ड अंतर्गत मंजूर १५ हजार कोटी अर्थसहाय्यातुन रु.५०० कोटी निधीची मंजूर करण्यात आला प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आहे.
तापी विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु असलेली विकासकामे मंजूर निधी पुढीलप्रमाणे
- सुलवाडे-जामफळ-कनोली उ.सि.योजना, ता.शिंदखेडा १२८.८० कोटी मंजूर झाले आहेत. या उपसा सिंचन योजनेचा बळीराजा जलसंजीवनी योजने अंतर्गत समावेश असून योजनेचे काम सन २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- महाकाय पुनर्भरण योजना (मेगा रिचार्ज) प्रकल्पचा डीपीआर तयार झाला आहे. केंद्र शासन सहाय्यीत बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ठ असून जुन-२०२० पर्यंत पाणीसाठा निर्माण करुन जुन २०२१ अखेर प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून एकूण ४२२.४६ कोटी मंजूर, वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्प, ता.चाळीसगाव १६२.८६ कोटी निधी देण्यात आला असून 2021 पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, तसेच शेळगांव बॅरेज मध्यम प्रकल्पास १६२.२२ कोटी नधी देण्यात आला असून बळीराज संजीवनी अंतर्गत जुन-२०२१ अखेर प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.
- कमानीतांडा मध्यम प्रकल्प योजनेंतर्गत जामनेर तालुक्यातील ७ साठवण तलाव व २ पाझर तलाव हे वाघुर नदीवर वळण बंधारा बाधून भरणे प्रस्तावित असून या योजनेवर एकूण रु.१३२.०४ कोटी खर्च झाले असून प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
- देहली मध्यम प्रकल्प, ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार सदर प्रकल्प अक्कलकुवा तालूक्यातील आदिवासी क्षेत्रात आहे. प्रकल्पीय सिंचन क्षेत्र -३४८१ हेक्टर, एकूण पाणीसाठा- १९.०८ दलघमी (०.६७ टीएमसी) अद्यावत खर्च रु.१६३.७९ कोटी झाला आहे. प्रकाशा-बुराई उ.सि.योजना, ता.जि.नंदुरबार येथे रु.६२.४६ कोटी खर्च झाला असून प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहे.
- धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ सहकारी उपसा सिंचन योजना विशेष दुरुस्तीसाठी एकूण रु.३४.०१ कोटी निधी खर्च झाला असून विशेष दुरस्तीअंती ९१९० हेक्टर क्षेत्र सिंचना खाली येणार आहे. अंजनी मध्यम प्रकल्प येथे एकूण रु.१७५.८६ कोटी निधी खर्च, पद्मालय- २ उपसा सिंचन योजना १३०.४४ कोटी निधी खर्च झाला असून प्रकल्पाची उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे.
पहा । सिंचन प्रकल्प योजनांबाबत माहिती देतांना ना. गिरीश महाजन सोबत आमदार राजूमामा भोळे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/388550211835756/