जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संभाजी नगरात राहणाऱ्या वृध्दाचे बंद घर फोडून घरातून ६२ हजार रूपये किंमतीचे वेगवेगळे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी १ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २ मे रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुनहा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अरूण जगन्नाथ सांगवीकर वय ६५ रा. पांडूरंग सोसायटी, संभाजी नगर, जळगाव हे वृध्द आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २० एप्रिल रोजी रात्री १० वाजता ते घर बंद करून बाहेरगावी कामाच्या निमित्ताने गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला व्यवस्थित कुलूप लावले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून ६२ हजार रूपये किंमतीचे चांदीचे वेगवेगळे दागिने चोरून नेले. हा प्रकार बुधवारी १ मे रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला. त्यांनी गुरूवारी २ मे रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत हे करीत आहे.