पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांगलादेशातील धार्मिक हिंसाचाराच्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला असून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांना स्वाक्षरी मोहिमेचे निवेदन सादर करण्यात आले. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप जीवांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या पहूरबंद मध्ये शहर पत्रकार संघटनेने सहभाग नोंदविला. यावेळी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. सायंकाळी पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांना स्वाक्षरी मोहिमेचे निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र लाठे, उपाध्यक्ष जयंत जोशी, सचिव शंकर भामेरे, ज्येष्ठ सल्लागार शांताराम आप्पा लाठे, माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे, मनोज जोशी, रवींद्र घोलप, प्रवीण कुमावत, किरण जाधव, डॉ. संभाजी क्षिरसागर, हरिभाऊ राऊत, संतोष पांढरे यांच्यासह पोलीस कर्मचारी गोपाल गायकवाड , अरुण पाटील उपस्थित होते .स्वाक्षरी अभियानात गावातील देशभक्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.