Home Uncategorized आधी खडसेंकडून तर आता विरोधात : शामल झांबरे पुन्हा दुध संघात !

आधी खडसेंकडून तर आता विरोधात : शामल झांबरे पुन्हा दुध संघात !

0
76


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ सोसायटी मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलच्या शामल झांबरे यांनी विजय संपादन केला आहे.

आधीच्या कार्यकारी संचालक मंडळात शामल अतुल झांबरे या भुसावळ सोसायटी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. अर्थात, त्या खडसे यांच्या पॅनलमध्ये होत्या. यंदा त्यांनी त्यांच्या विरूध्दच्या म्हणजेच शेतकरी विकास पॅनलमधून निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात सहकार पॅनलने शालीनी ढाके यांना उमेदवारी दिली होती.

आज सकाळी झालेल्या मतमोजणीत शामल अतुल झांबरे यांचा विजय झाला आहे. त्यांना २६३ मते मिळाली असून शालीनी ढाके यांना १६९ मते मिळाली आहेत. अर्थात यामुळे त्या ९४ मतांचे मताधिक्य घेऊन लागोपाठ दुसर्‍यांदा जिल्हा दुध संघात संचालक म्हणून निवडून आल्या आहेत.


Protected Content

Play sound