मंगेश चव्हाणांना होम पीचवर धक्का : प्रमोद पाटलांची सरशी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट मुक्ताईनर सोसायटी मतदारसंघातून मंदाताई खडसे यांच्यासारख्या हेवीवेट उमेदवाराचा पराभव केला असला तरी त्यांच्याच तालुक्यात अर्थात चाळीसगाव सोसायटी मतदारसंघात त्यांना धक्का बसला आहे.

आमदार मंगेश चव्हाण हे दुध संघाच्या निवडणुकीतील जायंट किलर ठरले आहेत. त्यांचा स्वत:चा ठराव हा चाळीसगाव तालुक्यातला असल्याने ते तेथूनच निवडणुकीत उभे राहतील अशी शक्यता होती. मात्र दुध संघात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने त्यांनी थेट खडसेंच्या बालेकिल्लयात उभे राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांच्या वतीने शेतकरी विकास पॅनलतर्फे सुभाष नानाभाऊ पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्या समोर सहकार पॅनलतर्फे माजी दूध संघ संचालक प्रमोद पाटील यांचे आव्हान होते.

आज झालेल्या मतमोजणीत प्रमोद पांडुरंग पाटील यांना २४८ मते मिळाली. तर सुभाष नानाभाऊ पाटील यांना १८८ मते मिळाली. यामुळे प्रमोद पाटील हे ५० मते मिळवून विजयी झालेत. ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे खंदे समर्थक आहेत. यामुळे एकीकडे आमदार मंगेश चव्हाण यांचा लौकीक वाढला असतांना दुसरीकडे त्यांना तालुक्यातच धक्का बसला आहे.

Protected Content