भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

 

चाळीसगाव:  प्रतिनिधी ।  घराकडे  पायी  जात असलेला व्यक्तीला अज्ञात ट्रकचालकाने मागून धडक देऊन जबर दुखापत पोहोचवल्याची घटना चाळीसगाव शहरातील सिग्नल पॉईंट येथे घडली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली

 

सुरेश पाटील (रा. फुले कॉलणी) चाळीसगाव येथे वास्तव्यास आहेत. २१ फेब्रुवारीरोजी रात्री सुरेश पाटील हे सिग्नल पॉईंट जवळून घरी जात असताना धुळे कडून औरंगाबाद कडे जाणार्या भरधाव ट्रकने ( क्र. एम.एच. १८ बी. ए. ७८२४) अचानक मागून धडक देऊन घटनास्थळावरून चालक पसार झाला. सुरेश पाटील यांच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली आहे. ट्रकचालकाचे नाव व गाव काहीच माहीत नसून भानुदास पाटील (रा. लक्ष्मीनगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात आज फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास करण्यात येणार आहे.

 

Protected Content