चाळीसगावात कोरोनाचा स्फोट; शहरासह ग्रामीणमध्ये वाढला संसर्ग

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यात सर्व उपाययोजना करून देखील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास तयार नसल्याचे आजच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

चाळीसगाव तालुक्यात आज ५७ नवीन बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात आजवर एकाच दिवशी इतक्या जास्त प्रमाणात रूग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दरम्यान, आजच्या आकडेवारीमुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ९७४ इतकी झालेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील ५२२ रूग्ण बरे झाले आहेत. आजच चार रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज दोन मृत्यू झाले असल्याने मयतांची एकंदरीत संख्या ४२ इतकी झालेली आहे. तर तालुक्यातील ४१० रूग्ण सध्या उपचार घेत आहेत.

चाळीसगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या नियमांचे चांगले पालन करण्यात आल्यामुळे पहिल्या टप्प्यात बरेच दिवसांपर्यंत कोरोनाचा संसर्ग आढळून आला नव्हता. तथापि, नंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचे दिसून आले आहे. यात मृतांची संख्या देखील वाढल्याचे दिसून आले आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, chalisgaon corona news, chalisgaon corona, chalisgaon news, chalisgaon latest news, chalisgaon

Protected Content