रेकॉर्ड ब्रेक : जिल्ह्यात आज ६०१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ६०१ नवीन कोरोना बाधीत आढळून आले असून यात जळगावातील सर्वाधीक रूग्ण आहेत. सहाशे पेक्षा जास्त रूग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ६०१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १२९ रूग्ण हे जळगावात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल अमळनेर तालुक्यात ८२ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-६८; भुसावळ-१३; चोपडा-४१;पाचोरा-२३; भडगाव-२७; धरणगाव-२९; यावल-८; एरंडोल-४२; जामनेर-४; रावेर-९; पारोळा-३२; चाळीसगाव-५७; मुक्ताईनगर-२१; बोदवड-१२ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ४ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या १८२९७ इतकी झालेली आहे. यातील १२,४४४ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ३४३ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १२ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ६६२ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ५१९१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content