गुढीपाडव्यापासून प्रभू श्रीराम जन्मसोहळा उत्सवास प्रारंभ

shri ram

भुसावळ प्रतिनिधी । शहर व परिसरातील आराध्य दैवत व ग्राम देवतांपैकी एक म्हणजेच प्राचीन श्रीराम मंदिर इ.स. 1858 मध्ये स्थापन झालेले श्रीराम मंदिरा वार्डातील श्री रामचंद्रजी महाराज संस्थान तर्फे श्रीराम मंदिराचे जिर्णोद्धार निम्मे झाले असून त्या नुतन मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा सप्ताह दरवर्षाप्रमाणे यावर्षीही सर्व भक्तांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होणार आहे.

कार्यक्रमांची दैनंदिनी याप्रमाणे
६ एप्रिल गुढीपाडवा चैत्र मासारंभच्या दिवशी सकाळी ७ वाजता पूजा अर्चा, अभिषेक राष्ट्रसेविका समितीतर्फे दुपारी २.३० ते ४.३०भजने, सायं.५ ते ६ व्याख्यान माला व भजन करण्यात आले. ७ मार्च रोजी पूजा अर्चा, अभिषेक, प्रल्हाद महाराज उपासना, रामायण व्याख्यान माला, ८ रोजी पूजा अर्चा श्रीमती माई आठवले भजनी व अनेक कार्यक्रम, ९ रोजी सकाळी ९ ते ११ अथर्वशिर्ष दुपारी राजगौंड भजनी मंडळातर्फ भक्तीगिते सायंकाळी राधाकृष्ण प्रभात फेरी व राजस्थानी विप्र समाजातर्फे रामदेव बाबा किर्तन मंडळातर्फे भजने सायं. ७ ते ९, १० रोजी दुपारी श्रीराम भजनी मंडळातर्फे किर्तन, ११ सकाळी पुजा अर्चा, लक्ष्मी भजन मंडळातर्फे भक्तीगीते व्याख्यान माला, १२रोजी सकाळी पूजा अर्चा, दुपारी भजने, सायं. रामायण व्याख्यान, १३ रोजी सकाळी १० ते १२ किर्तन हरी किर्तन शिरोमणी ह. भ.प. साह. नलीनीताई विनायक वरणगांवकर यांचे श्री प्रभू श्रीराम जन्म सोहळा निमीत्त कीर्तन होऊन दुपारी १२ वाजता श्रीराम नवमी साजरी होईल. तरी सर्व बंधू भगीनींनी १३ एप्रिलपर्यंत होणार्‍या उत्सवात उपस्थिती व मदत करुन सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष श्रीराम चौक, राध्येशाम लाहोटी, जे. बी. कोटेचा, विनोद शर्मा तसेच भक्तजनांनी केले आहे.

Add Comment

Protected Content