अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेरतालुक्यातील कळमसरे येथील जैन मंदिराजवळ श्रीमद भागवत कथा पुराण सप्ताहाला नुकतीच सुरुवात झाली आहे. कथेचा पहिल्या दिवशी गावातून भव्य दिव्य अशी कलश यात्रा व मिरवणूक काढण्यात आली होती. अयोध्यावासी भागवताचार्य बाल व्यास सोमदेव महाराज हे कथा निरूपण करीत असून ,दररोज सायंकाळी साडे सात वाजल्या पासून भागवत कथेचे संगीतमय रित्या पठन केले जात आहे.
दरम्यान 10 फेब्रुवारी रोजी या कथेची सांगता होणार आहे. याकरिता गावातील श्रीराम भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ तसेच रामचंद्र पाटील व त्यांचा वैराळे परिवार परिश्रम घेत आहेत.
कळमसरे येथे श्रीमद भागवत कथा प्रारंभ
1 year ago
No Comments