यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री. सच्चिदस्वरुप बहूउद्देशिय संस्था संचलीत श्री. गजानन महाराज फाऊंडेशन तर्फे साकळी ते शेगाव पदयात्रेस आजपासून शुभारंभ झाला आहे. पदयात्रेचे यंदाचे १३ वे वर्ष असून परिसरातील तब्बल १२५ भाविक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
यावल तालुक्यातील साकळी येथील मनवेल रोड वरील जोशी फार्म मधील श्री.गजानन महाराज देवस्थानातून ७ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता पदयात्रा सुरू झाली आहे. पदयात्रेचा भुसावळ, मुक्ताईनगर, वडनेर भोलजी व खामगाव येथे मुक्काम राहिल. पदयात्रेत दररोज पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी ११ वाजता श्रींची महाआरती,सायंकाळी साडेपाच वाजता हरिपाठ,सायंकाळी सात वाजता आरती आदी नित्योपासना होतील. साकळी ते शेगाव पदयात्रेचे साकळी गावात यंदाही जल्लोषात स्वागत केले जाईल.
लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते मुख्य चौकात पूजन होऊन पदयात्रा सुरू झालेली आहे. पदयात्रा शिरसाड मार्गे भुसावळकडे प्रयाण करेल. यंदा पदयात्रेचे १३ वे वर्ष आहे. ११ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पदयात्रा शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात पोहचेल. या ठिकाणी श्री. गजानन महाराज संस्थानतर्फे रथाचे स्वागत होऊन पदयात्रेकरुंना कापड प्रसाद वितरण केले जाईल. पदयात्रेत सहभागासाठी नाव नोंदणी अत्यावश्यक राहणार असल्याने परिसरातील भाविकांनी नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी श्री. गजानन महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, वासुदेव मोते, पितांबर बडगुजर, हर्षल बाविस्कर, मुकेश बोरसे आदींशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.